रविवार, १ जानेवारी, २०१२

जॉन लॉक 
          (१६३२-१७०४)



                                       जॉन लॉक चा जन्म इ. स. १६३२ मध्ये इंग्लडमध्ये झाला त्याचे वडील मध्यमवर्गीय होते जॉन लहानपणापासूनच बुद्धिमान होता  विश्वविद्यालयातून एम. ए. ची परीक्षा पास झाल्यावर त्याच विद्यालयात तो प्राध्यापक झाला त्या काळात त्याचा संबध लॉर्ड श्याफ्टरशी आला. त्या मुळे राजकारणाचे व्यावहारिक न्यान लॉक ला मिळाले त्यानंतर त्याने व्हिग पक्षाचे कार्य केले परंतु अत्याधिक परिश्रमाने तो क्षयरोगाने पछाडला गेला. त्यानंतर तो फ्राचे मध्ये गेला. तेथे त्याने आपले राजकीय विचार प्रकाशित केले. १६८३ मध्ये काही राजकीय कारणामुळे त्याला इंग्लंड सोडावे लागले.१६८३ ते १६८८ पर्यंत तो हॉलंड मध्ये होता. १६८८ मध्ये इंग्लंड मध्ये जी रक्तहीन क्रांती झाली त्याचे समर्थन जोन लॉक ने केले . तो पुन्हा इंग्लंड मध्ये आला. त्याने युगप्रवर्तक म्हणून क्रांतीचे जोरदार समर्थन केले. वयाच्या ७२ व्या वर्षी म्हणजे  इ. स. १७०४ मध्ये त्याचा मृत्यू झाला.



ग्रंथ रचना :-  
                              लॉक ने राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,धर्मशास्त्र,शिक्षण इत्यादी अनेक विषयावर लिखाण केले. राज्यशास्त्राच्या दृष्टीने पुढील काही ग्रंथ महत्वाचे आहेत.
  • 1. Letters on Toleration, 1689
  • 2. Two Treatises on Government, 1690
  • 3. Essay Concerning Human Undersanding, 1690
  • 4. The Fundamentals of Constitution of Caroline, 1692                                                                                                                  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा