- थोमस हॉब्स -
थोमस हॉब्सचा जन्म १५८८ मध्ये मिअल्सामनरो येथे झाला लहानपानापासूनच तो अध्ययनशील ,अनुशाशासनप्रिय आणि भित्रा होता इंग्लंड मधील गृह युद्धाच्या वेळी तो इंग्लंड सोडून गेला. २० वर्ष पर्यंत तो युरोप विशेषत फ्रांसमध्ये राहिला. तेथील निरंकुश राजतंत्राने त्याच्यावर प्रभाव टाकला. चार्ल्स द्वितीय चा तो गुरु होता. निरंकुश राजसत्ता अराजकता नष्ट करू शकते अशी त्याची धारणा झाली होती.
हॉब्सचा वेळी इंग्लडमधील परिस्थिती फारच संघर्षमय होती. स्तुअर्त वंशाचे शासक स्वताला ईश्वराचे प्रतिनिधी समजून निरंकुश बनू पाहत होते. दुसरीकडे इंग्लडमधील जनता राज्याच्या दैवी अधिकाराला विरोध करत होती. तिसऱ्या बाजूने पोप आपले श्रेष्टत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. सत्तेसाठी तिघांमध्ये संघर्ष सुरु होता. मानवी स्वभावाचे त्याचे केलेले वर्णन हे इंग्लंडच्या त्या वेळच्या पारीस्तितीवरूनच केले आहे. हॉब्सला अनुशासन व शक्तिशाली सत्ता पाहिजे होती. त्याच कारणाने त्याने करारवादी सिद्धांत मांडून निरंकुश वादाचे समर्थन केले. इतर विचारवंतांवर जसा काळाचा प्रभाव पडतो तसाच हॉब्सवरही पडला. हॉब्सच्या निरंकुश सार्वभौमाने त्याला अजरामर केले. क्रांतिकारी विचार माघे ठेवून १६७९ मध्ये त्याने आपली इहलोकाची यात्रा संपवली.
ग्रंथरचना :-
हॉब्सने निरनिराळ्या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत त्याचे महत्वाचे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत -
- १) De Corpore 1655
- २) De Cive 1642
- ३) Leviathan 1651
- ४) De Homine 1659
- ५) Elements of Low 1650
- ६) Thucydicles 1928
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा