जीवन परिचय
प्राचीन राज्याशास्रामध्ये कौटिल्याचे स्थान महत्वपूर्ण आहे. कौटिल्याच्या अगोदर जरी भारतात राज्याशाश्रज्ञ होऊन गेले असले तरी कौतील्यालाच भारतीय राज्यशास्त्राचा जनक मानले जाते. कौटिल्याने राजकीय सिद्धांताचे विवेचन करून त्यांना स्वरूप दिले कौटिल्याचे नाव विष्णूगुप्त होते पण तो चाणक्य याच नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्याची "चाणक्यनिती" इतिहास प्रसिद्ध आहे. कौटिल्याच्या जन्माबाबत निस्शीत अशी माहिती उपलब्ध नाही. तरी अंदाजे इ.स.पू. ३५० च्या सुमारास तो महामंत्री म्हणून काम पाहत असे अशा प्रकारचे पुरावे आढळतात .
चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चाणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टिका केल्याने
राजद्रोहाबद्दल चाणक यांना अटक केल्या गेली व त्यांचा कारावासात म्रुत्यू
झाला. पाटलीपुत्रमध्ये नंद राजवटीत चाणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने
विष्णुगुप्तने ताक्षशिलाला प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर विष्णुगुप्तने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व अर्थशास्त्र
या विषयांवर शिक्षकी सुरु केली व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून
विष्णुगुप्तने आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत
असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या हाताखाली तयार झाले
त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडीत नसूनही चाणक्याचे भारताच्या राजकीय
वर्तुळात नाव आदराने घेतले जाई. कैकेय
देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्य चा मित्र होता असे मानतात.
लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्तने बाळगले
होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते त्यात चंद्रगुप्त मौर्य हाही होता.
laxman petare

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा