शनिवार, २४ डिसेंबर, २०११

थोमस हॉब्स

                                    - थोमस हॉब्स -


                                                   थोमस हॉब्सचा जन्म १५८८ मध्ये मिअल्सामनरो येथे झाला लहानपानापासूनच तो अध्ययनशील ,अनुशाशासनप्रिय आणि भित्रा होता इंग्लंड मधील गृह युद्धाच्या वेळी तो इंग्लंड सोडून गेला. २० वर्ष पर्यंत तो युरोप विशेषत फ्रांसमध्ये राहिला.  तेथील निरंकुश राजतंत्राने त्याच्यावर प्रभाव टाकला. चार्ल्स द्वितीय चा तो गुरु होता. निरंकुश राजसत्ता अराजकता नष्ट करू शकते अशी त्याची धारणा  झाली होती.
                                                                         हॉब्सचा वेळी इंग्लडमधील परिस्थिती फारच संघर्षमय होती. स्तुअर्त वंशाचे शासक स्वताला ईश्वराचे प्रतिनिधी समजून निरंकुश बनू पाहत होते. दुसरीकडे इंग्लडमधील जनता राज्याच्या दैवी अधिकाराला विरोध करत होती. तिसऱ्या बाजूने पोप आपले श्रेष्टत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. सत्तेसाठी तिघांमध्ये संघर्ष सुरु होता. मानवी स्वभावाचे त्याचे केलेले वर्णन हे इंग्लंडच्या त्या वेळच्या पारीस्तितीवरूनच केले आहे. हॉब्सला अनुशासन व शक्तिशाली सत्ता पाहिजे होती. त्याच कारणाने त्याने करारवादी सिद्धांत मांडून निरंकुश वादाचे समर्थन केले. इतर विचारवंतांवर जसा काळाचा प्रभाव पडतो तसाच हॉब्सवरही पडला. हॉब्सच्या निरंकुश सार्वभौमाने त्याला अजरामर केले. क्रांतिकारी विचार माघे ठेवून १६७९ मध्ये त्याने आपली इहलोकाची यात्रा संपवली.
ग्रंथरचना :-
                                                               हॉब्सने निरनिराळ्या विषयावर ग्रंथ लिहिले आहेत  त्याचे महत्वाचे ग्रंथ पुढील प्रमाणे आहेत -

  • १) De Corpore 1655
  • २) De Cive 1642
  • ३) Leviathan 1651
  • ४) De Homine 1659
  • ५) Elements of Low 1650
  • ६) Thucydicles 1928


बुधवार, ७ डिसेंबर, २०११

कौटिल्याचे अर्थशास्त्र

अर्थशास्त्र ह्या ग्रंथाचे १४ विभाग आहेत

१) प्रथम भागात राज्याचा उद्देश्य राज्याची उत्त्पती, राज्याची आवश्यकता, राज्याचे वर्गीकरण इ. चा विचार व्यक्त करण्यात आलेला आहे.
२) द्वितीय विभागात शासनाच्या आधीकार्र्याचे कार्यक्षेत्र वर्णन केले आहे.
३) तिसर्र्या व चौथ्या भागात कायदा, न्यायालय व दंड व्यवस्थेचे वर्णन आहे.
४) पाचव्या भागात राज्याच्या कर्तव्यासंबंधी विवेचन आले आहे.
५) सहाव्या भागात राज्याचे आवश्यक घटक वर्णन केले आहे.
६) सात ते चौदा या भागात परराष्ट्रधोरण , कुटनीती व  संरक्षन ह्या गोष्टी वर्णन आहे. 
                 

 लक्ष्मन पेटारे 

कौटिल्य

जीवन परिचय 
                                                                

                                                                    प्राचीन राज्याशास्रामध्ये कौटिल्याचे स्थान महत्वपूर्ण आहे. कौटिल्याच्या अगोदर जरी भारतात राज्याशाश्रज्ञ होऊन गेले असले तरी कौतील्यालाच भारतीय राज्यशास्त्राचा  जनक मानले जाते. कौटिल्याने राजकीय सिद्धांताचे विवेचन करून त्यांना स्वरूप दिले कौटिल्याचे नाव विष्णूगुप्त होते पण तो चाणक्य याच नावाने जास्त प्रसिद्ध आहे. त्याची "चाणक्यनिती" इतिहास प्रसिद्ध आहे. कौटिल्याच्या जन्माबाबत  निस्शीत अशी  माहिती उपलब्ध नाही. तरी अंदाजे इ.स.पू. ३५० च्या सुमारास तो महामंत्री म्हणून काम पाहत असे अशा प्रकारचे पुरावे आढळतात .
                                                                                                          चाणक्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. सर्वांत प्रचलित कथेनुसार चाणक्य अथवा विष्णुगुप्त हा पाटलीपुत्रमधील 'चाणक' या प्रतिभावान शिक्षकाचा मुलगा होता. नंद राजवटीवर टिका केल्याने राजद्रोहाबद्दल चाणक यांना अटक केल्या गेली व त्यांचा कारावासात म्रुत्यू झाला. पाटलीपुत्रमध्ये नंद राजवटीत चाणक परिवाराचे जगणे असह्य झाल्याने विष्णुगुप्तने ताक्षशिलाला  प्रयाण केले. तक्षशिला येथील विद्यापीठात शिक्षण पूर्ण केल्यानंतर विष्णुगुप्तने तक्षशिला विद्यापीठातच राजनीती व अर्थशास्त्र या विषयांवर शिक्षकी सुरु केली व अत्यंत प्रभावी शिक्षक म्हणून विष्णुगुप्तने आपली ओळख निर्माण केली. राजनीती व अर्थशास्त्र हे विषय शिकवत असल्याने भारतातील अनेक राज्यांचे मंत्री चाणक्यांच्या हाताखाली तयार झाले त्यामुळे कोणत्याही राज्याशी निगडीत नसूनही चाणक्याचे भारताच्या राजकीय वर्तुळात नाव आदराने घेतले जाई. कैकेय देशाचा महामंत्री इंद्रदत्त हा चाणक्य चा मित्र होता असे मानतात. लहानपणापासूनच नंद राजवट उलथून टाकण्याचे स्वप्न विष्णुगुप्तने बाळगले होते. त्यादृष्टीने तयारी म्हणून त्याने आपले शिष्य तयार केले होते त्यात चंद्रगुप्त मौर्य हाही होता.
 laxman petare